stampduty
महाराष्ट्र शासनासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचा भरणा.
महाराष्ट्र शासन – मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचा भरणा आणि साधी पावती आणि/किंवा ई-एसबीटीआर जारी करणे.
- महाराष्ट्र शासन - नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांनी, मान्यताप्राप्त बँकांमार्फत जनतेकडून जीआरएएस (GRAS) द्वारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या बँका, यथास्थिती, साधी पावती किंवा इलेक्ट्रॉनिक सुरक्षित बँक आणि ट्रेझरी पावती (ई-एसबीटीआर) जारी करू शकतात.
- बँक मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क स्वीकारण्यास अधिकृत आहे आणि प्रकरणानुसार साधी पावती किंवा ई-एसबीटीआर जारी करते.
- ई-एसबीटीआर ही एक इलेक्ट्रॉनिक - सुरक्षित बँक आणि ट्रेझरी पावती आहे, जी सहभागी बँकेच्या अधिकाऱ्याद्वारे, व्हर्च्युअल ट्रेझरीमध्ये मुद्रांक शुल्क भरल्यावर, सुरक्षित सरकारी स्टेशनरीवर जारी केली जाते, तर साधी पावती ही सहभागी बँकेद्वारे किंवा दस्तऐवजातील पक्षाद्वारे, व्हर्च्युअल ट्रेझरीमध्ये मुद्रांक शुल्क भरल्यावर, प्रणालीमधून साध्या कागदावर छापलेली पावती आहे.
- ई-एसबीटीआरसाठी व्यवहाराचे किमान मूल्य रु. ५,०००/- असावे आणि यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
- ई-एसबीटीआर प्रिंट विनामूल्य आहे.
- ई-एसबीटीआर घेण्यासाठी शाखेत ओळखपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
- एकदा मुद्रांक शुल्क भरल्यानंतर इनपुट डेटामध्ये कोणताही बदल करणे शक्य नाही.
- डीडी/चेकच्या बाबतीत, डीडी/चेक वटल्यानंतरच ई-एसबीटीआर/ साध्या पावतीची छापील प्रत दिली जाईल.
-
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचे हे पेमेंट आमच्यामार्फत खालील पद्धतींनी करता येईल.
काउंटरवर - रोख / चेक / डीडी (तपशिलासाठी कृपया क्लिक करा)
ई-पेमेंट - इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन (तपशिलासाठी कृपया क्लिक करा) - मुद्रांक शुल्क भरण्यासंबंधी अधिक तपशील/माहितीसाठी, शुल्क भरणारे www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.