जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती
बीओआय गिफ्ट कार्ड
वाढदिवस, सण, लग्नसमारंभ अशा कोणत्याही प्रसंगी भेटवस्तू देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गिफ्ट कार्ड. गिफ्ट कार्ड रिसीव्हरला त्याच्या/ तिच्या आवडीची भेटवस्तू निवडण्याचा पर्याय देते, अशा प्रकारे प्रेषक आणि रिसीव्हर दोघांनाही ते सोयीस्कर बनवते.
बँक ऑफ इंडिया गिफ्ट कार्ड मॅग्नेटिक-स्ट्रिपवर आधारित प्री-पेड कार्ड आहे. याला व्हिसाच्या आंतरराष्ट्रीय नामांकित आणि विस्तृत नेटवर्कचा पाठिंबा आहे. भारतभरात व्हिसा कार्ड स्वीकारणार् या कोणत्याही व्यापारी आस्थापनामध्ये हे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखे वापरले जाऊ शकते.